¡Sorpréndeme!

अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद;कोरोनामुळे ट्रस्टचा निर्णय | Pune | Sakal |

2021-03-02 368 Dailymotion

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरांतून दरवर्षी येणा-या सुमारे ३ ते ४ लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
#pune #sakalmedia #dagdushethganpatimandir